परंडा (प्रतिनिधी)- दि.21 परंडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीत उमेदवारी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार दि.21 रोजी एक नगराध्य पदासाठी
3 उमेदवार पैकी एकाने माघार घेतल्याने नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत होणार आहे. तर 10 प्रभाग साठी 20 उमेदवार नगरसेवक पदासाठी एकूण 43 उमेदवार निवडणूक लढवित असल्याचे चित्र सपष्ट झाले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्य जाकिर सौदागर व जनशक्ती नगर विकास आघाडीचे विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांच्यात चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने एक आजी व दोन माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागरणार आहे.
प्रभाग क्रमांक 1 अ मधून बनसोडे सुवर्णा तानाजी बनसोडे, मिनाक्षी लक्ष्मीकांत बनसोडे , रत्नमाला राहूल बनसोडे, आदिका सुभाष पालके.प्रभाग क्र.1 ब मधून विधाते श्रीकृष्ण कुमार व घाडगे संजय विजय. प्रभाग क्र. 2 अ मधून पठाण रुक्सानाबेगम रहिमतुल्ला, प्रभाग क्र.2 ब मधून कुरेशी इस्माईल अब्दूल सत्तार कुरेशी व सरफराज महमद शरीफ, प्रभाग क्र. 3 अ मधून बासले परवीन मन्नान व पठाण गुलजार शब्बीरखाँ , 3 ब मधून सद्दीवाल मदनसिंह व दिक्षित मदन मिलींद ,प्रभाग 4 अ मधून पठाण महिनाबी खाजा व पठाण जैतुनबी गौसखाँ ,4 ब मधून ठाकूर समरजितसिंह सुजितसिंह, कसबे नवनाथ एकनाथ व सौदागर अजीम महमद जाकेर, प्रभाग 5 अ मधून जाधव नंदा श्रीमंत व तांबोळी शमीम रशिद, 5 ब मधून मुजावर रईसोद्दीन व पठाण सत्तार गुलाबखाँ , प्रभाग 6 अ मधून शिंदे जयंत श्रीरंग व शिंदे अनिल महादेव, 6 ब मधून आलबत्ते वैशाली सोमनाथ व मेहेर मनिषा सोमनाथ, प्रभाग 7 अ मधून मुजावर अब्बास उमर व शेख इरफान जब्बार, 7 ब मधून दहेलूस रुखियाबी जकेरिया व जगताप कमल अरुण, प्रभाग 8 अ मधून चौधरी गुले इरम नुरोद्दीन एम.युनुस व सौदागर महमद साबेर महमद इस्माईल, 8 ब मधून जाधव शोभा नवनाथ व मुजावर अमिनाबी अब्रार , प्रभाग 9 अ मधून पठाण हसिना व जिनेरी मन्नाबी मतीन, 9 ब मधून गोरे जमाकांत शंकर व गायकवाड चंद्रकांत नाना , प्रभाग 10 अ मधून शिंदे वनमाला रामा व सोनटक्के ज्योती धनंजय, 10 ब मधून परदेशी रमेशसिंह गोकुळसिंह व सौदागर मोहसिन जाकिर उसे उमेदवार निवणूकीत काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकणी तिरंगी अशी लढत होणार आहे.शिवसेना शिंदे गट विरुद्ध जनशक्ती नगरविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार असून या निवडणूकीच्या रणधुमाळी मध्ये कोण बाजी मारणार याकडे परंडा शहर वासीयांचे लक्ष लागले आहे.