धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच धाराशिवच्या वतीने नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग गोरे कॉम्पलेक्स, धाराशिव येथे संविधान दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून ॲड. पल्लवी वाघमारे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. राम चंदनशिवे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. यावेळी प्रा. राम चंदनशिवे यांचे पुष्पगुच्छ देवून प्रा. अंबादास कलासरे यांनी स्वागत केले. ॲड. पल्लवी वाघमारे यांचे पुष्पगुच्छ देवून अमोल गडबडे यांनी स्वागत केले. आर.डी. अंगरखे यांनी प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमात डॉ. रत्नाकर मस्के यांची एमपीएससी मार्फत प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष प्रा. रवि सुरवसे यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना ॲड. पल्लवी वाघमारे म्हणाल्या की, भारतीय संविधान आहे म्हणून भारत आजपर्यंत एकसंघ राहिला आहे. संविधान हे नागरिकांना अधिकारासोबत कर्तव्याची जाणीव करुन देते. संविधानाने स्त्री-पुरुष समानता दिली. समान वेतन दिले. अस्पृश्यता कायमची हाटवली आहे. तेंव्हा संविधानाचे रक्षण करणे ही भारतीयांची सर्वांची जबाबदारी आहे. सभागृहातील सदस्यांनीही संविधान रक्षणासाठी बोलले पाहिजे. अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे.

अध्यक्षीय समारोप करताना प्रा. राम चंदनशिवे म्हणाले की, संविधानाने जाती व्यवस्था संपवली आहे. पण सध्याही जाती व्यवस्था डोके वर काढताना दिसते आहे. संविधानाने जातीच्या उतरंडी कायमच्या संपवल्या आहेत. घटना मसूदा समितीतील सदस्यांपैकी सर्वात जास्त जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली व संविधान लिहून पूर्ण केले. म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांना, मागासवर्गीयांना आरक्षणाची संधी दिली आहे. त्यामुळेच त्यांना शिक्षणाचे दारे खुली झाली आहेत. बहुजनांनी सतत जागृत राहून समतेच्या चळवळीत सहभागी झाले पाहिजे व संविधानाचे रक्षण केले पाहिजे.

कार्यक्रमाचे आभार प्रा. संजय मिसाळ यांनी मांडले. कार्यक्रमास पंडीत कांबळे, बलभीम कांबळे, अशोक बनसोडे, दिपक सरवदे, प्रभाकर बनसोडे, बाळासाहेब माने, नितीन माने, एच.एम. गायकवाड, प्रा. बलभीम ओव्हाळ, अनंत वाघमारे, सुदेश माळाळे, सी.के. मस्के, रत्नाकर मस्के, प्रदिप शिंदे, ॲड. अनुरथ नागटिळक, दिलीप शिंदे, विकास काकडे, इनामदार अहेमद मसूद, साहिल माने इत्यादीची उपस्थिती होती.

 
Top