मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे 'वंदे मातरम ' आनंदमठ कादंबरी बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाविद्यालयात एनसीसी विभागातर्फे वंदे मातरम गीत गाऊन देशभक्ती, देशप्रेम विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयात सर्वप्रथम वंदे मातरम गीत गाण्यात आले त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले सर यांनी कॅडेट्सना या दिवसाचे ऐतिहासिक व वंदे मातरम गिताचा संपूर्ण अर्थ महत्त्व सांगुन मार्गदर्शन केले. सरांनी आपल्या भाषणात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या गीताने सर्व देश भक्तांना एक सूत्र ते मध्ये बांधण्याचे काम केले . तसेच हजारो, लाखो भारतीयांनी वंदे मातरम म्हणत ब्रिटिशांच्या गोळ्या आपल्या छातीवर घेतल्या देशासाठी प्राण दिला पण वंदे मातरम म्हणतच. ऐवढे सामर्थ्य , देशप्रेम , शक्ति या गिता मध्ये होते असे सांगितले . आज सुद्धा हे गित कालजयी आहे त्यासाठी संपूर्ण भारतीयांनी भारत मातेला वंदे मातरम म्हणजेच मातृभूमिला वंदन करणे होय व आजच्या काळात सर्वांमध्ये देशप्रेम , देशभक्ति जागृत होणे महत्वाचे आहे असे सरांनी सांगितले . नंतर दिडशे वर्ष पूर्ण झाल्या बदल चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती चित्रकलेचा विषय होता 2047 मध्ये भारत कसा असेल? या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक पंकज जमादार, द्वितीय किरण सास्तुरे , तृतीय साक्षी राजपुत , सुलोचना सुर्यवंशी .
या वेळी मंचावर उपप्राचार्य डॉ विलास इंगळे , डॉ पदमाकर पिटले होते सुत्रसंचलन ,प्रास्ताविक कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले व आभार कॅडेट सुशांत जाधव यांनी मानले . यावेळी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका , शिक्षकेतर कर्मचारी , कॅडेटस या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
