धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि.च्या वतीने सन 2025- 2026 च्या द्वितीय गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 1 लाख जागरी पावडर पोत्यांचे पूजन तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याच्या माजी चेअरमन श्रीमती आनंदीदेवी पवन राजेनिंबाळकर व कारखान्याचे मार्गदर्शक आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते दि.24 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. तसेच 24 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू झालेल्या या कारखान्याच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त जागजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन नानासाहेब पाटील, विकास पाटील, सुनिल लोमटे, प्रविण पाटील, इ.इंजिनिअर प्रविण यादव, सुरक्षा अधिकारी मेजर चंद्रकांत पवार, परचेस अधिकारी रवि जोगदंड, सेल्स ऑफिसर सागर शिंदे, दत्तात्रय टेकाळे, गोडाऊन किपर सुरेंद्र गिरी, राजाभाऊ केवळराम, बालाजी गुळवे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
एनव्हीपी शुगर प्रा.लि. या जागरी पावडर निर्मिती कारखान्याने सन 2025-2026 च्या द्वितीय गळीत हंगामात 25 हजार मेट्रिक उसाचे गाळप करून 1 लाख जागरी पावडर पोत्यांचे उत्पादन केलेले अतिवृष्टीसारख्या कठीण परिस्थितीत सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब व्यंकटराव पाटील यांनी दिली.
एनव्हीपी शुगरला यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे गळीत हंगामाच्या सुरूवातीपासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ऑक्टोंबर महिन्यात संत-महंतांसह सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला होता. परंतु अतिवृष्टीमुळे ऊसफडात वाहने घेवून जाणे आणि तोडणी करताना अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली. या सर्व अडचणींवर चेअरमन नानासाहेब पाटील यांनी कुशल नियोजन करून गाळप हंगामाला सुरूवात केली. गळीत हंगामात कारखान्याच्या व्यवस्थापनातील प्रत्येकाने अहोरात्र परिश्रम करून 25 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. या हंगामात 1 लाख जागरी पावडर पोत्यांचे उत्पादन केले आहे. गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल चेअरमन नानासाहेब पाटील यांनी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कर्मचारी, ऊस उत्पादक, सभासद, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार, तोडणी यंत्र ठेकेदार, तोडणी मजूर आणि सर्व सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
