तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि पक्षाचे सचिव संजय मोरे,उपनेते ज्ञानराज चौगुले,जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते व धाराशिव जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यात शिवसेना पक्षाची संघटनवाढ मोहीम जोमात सुरू आहे.या मोहिमेअंतर्गत तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंदगाव येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्यात ग्रामस्थ व शिवसैनिकांची मोठी उपस्थिती होती. उद्घाटनावेळी झालेल्या सभेत तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी प्रत्येक गावात शाखा स्थापन करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात पक्षाचे जाळे मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला.

सिंदगाव येथे पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.ग्रामस्थांनी शिवसेनेच्या ध्येयधोरणांना दिलेला प्रतिसाद पाहता पक्षाची ताकद ग्रामीण भागात अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून आले. या सोहळ्यात तुळजापूर शहर प्रमुख बापूसाहेब भोसले,शहर उपाध्यक्ष रमेश चिवचिवे,शहर संघटक नितीन मस्के,संभाजी नेपते,शहाजी हाके,स्वप्निल सुरवसे,संजय लोंढे,गणेश पाटील,विकास जाधव,भुजंग मुकेरकर,आप्पासाहेब पाटील,सोमनाथ गुड्डे यांसह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील प्रत्येक गावात शाखा स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवून सुरू झालेल्या या मोहिमेमुळे तुळजापूर तालुक्यात शिवसेनेचे संघटन आणखी बळकट होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.


 
Top