धाराशिव (प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख हे मराठवाडच्या नियोजित दौऱ्यावर येणार आहेत. मराठवाड्यातील भेट देणार असून याचबरोबर ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. दिनांक 05 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई येथून खाजगी विमान छत्रपती संभाजीनगर येथे प्रयान करणार असून त्यानंतर खाजगी वाहनाने भुम तालुकयातील पाथ्रुड येथे 2:00 वाजता आगमन, परंडा तालुक्यातील शिरसाव येथे दुपारी 03:30 वाजता, घारी ता. बार्शी येथे सायंकाळी 05:00 वाजता, सायंकाळी 07:00 वाजता धाराशिव येथील शासकीय विश्रामगृह येथे धाराशिव, बीड, लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.
दिनांक 06 नोव्हेंबर 2025 रोजी धाराशिव येथून करजखेडा येथे प्रस्थान करणार आहेत. दुपारी 12:00 वा भुसनी येथे भेट देणार आहेत. त्यानंतर नियोजीत दौऱ्याकरीता प्रयाण करणार असल्याचे शिवसेना कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
