धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीमध्ये काही ठिकाणी महायुती झाली नाही. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दि. 22 नोव्हेंबर रोजी सोलापूरमध्ये येत आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल. अशी माहिती धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
धाराशिव जिल्ह्यात भूम, परंडा, धाराशिव येथे महायुतीमध्ये फुट पडली आहे. या संदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांनी भाजपने पाठीत खंजीर खुपसला अशी प्रतिक्रिया दिली होती. या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता पालकमंत्री सरनाईक यांनी आपण स्वतः संपर्क प्रमुख राजन साळवी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाप्रमुख आम्ही बसून धाराशिव नगर परिषद संदर्भात चर्चा करून असे सांगितले. धाराशिव बसस्थानकाच्या चौकशी समितीच्या अहवालातील दोषी विरोधात कारवाई करण्यात येईल असे सरनाईक यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
मुलींसाठी हेल्पलाईन
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी धाराशिव बसस्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांनींना त्यांच्या समस्यासंदर्भात विचारले. बससे वेळेवर लागत नाहीत, घरी जाण्यास उशीर होत असल्याने वादविवाद होतात. तीन ते चार तास बस लेट लागतात. या संदर्भात तक्रार केल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुलींना शाळेत किंवा महाविद्यालयात जाताना बसेस संदर्भात काही समस्या असल्यास एसटी महामंडळाने हेल्प लाईन चालू केल्यानंतर संपर्क साधावा असे सांगितले. यावेळी सरनाईक यांनी शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी एसटीच्या डेपो मॅनेजरवर राहिल असा इशाराही दिला.
