धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस पार पडला असून, मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 7 अपक्ष उमेदवारांनी अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतले. आता नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार रिंगणात उरले आहेत.
नगरसेवक पदासाठीही माघारीची मोठी लाट पाहायला मिळाली. एकूण 55 उमेदवारांनी अखेरच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतले असून, आता 201 उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीनंतर नगराध्यक्ष पदाची लढत सरळ होत असून 6 उमेदवारांत मुकाबला होणार आहे. यामधे काकडे नेहा राहुल, पुरेशी परविन खलील, गुरव संगीता सोमनाथ, मंजुषा विशाल साखरे, मोमीन नाझिया इसुफ, वाघमारे सुरेखा नामदेव यांच्यात लढत होणार आहे. तर नगरसेवक पदासाठी 201 उमेदवारांमुळे अनेक प्रभागांत तिरंगी आणि चौरंगी लढती रंगणार आहेत. माघारीमुळे काही प्रभागांतील राजकीय गणिते बदलली असून प्रचाराची हवा आता अधिक जोर धरताना दिसत आहे.