धाराशिव (प्रतिनिधी)- शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या जिल्ह्यातील सर्व नूतन कार्यकारणीची नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे.याच अनुषंगाने धाराशिव शहरात व धाराशिव तालुक्यात समितीच्या शाखा निर्माण करण्यासाठी जनसामांन्यातून मागणी येत होती. त्यानुसार धाराशिव शहरातील पहिली शाखा धारासुर मर्दिनी देवी मंदिर या भागात पहिल्या शाखेचे उद्घाटन समितीचे नूतन अध्यक्ष श्री अमोल सिरसट व शहराध्यक्ष श्री संतोष घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले.नूतन शाखेच्या शाखाध्यक्षपदी श्री पवन राऊत तर उपाध्यक्षपदी श्री मनोज घवांडे व श्री उत्तम जाधव तर सचिव श्री दीपक कदम कार्याध्यक्ष श्री गणेश सुरवसे कोषाध्यक्ष श्री आनंद देवकर प्रसिद्धीप्रमुख श्री एजाज शेख यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. धारासुर मर्दिनी देवीला पुष्पांजली वाहून फटाक्यांच्या आतषबाजीत व घोषणांनी समितीच्या शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले.ग्रामीण भागातील समितीची पहिली शाखा मौजे राघूचीवाडी येथे समितीचे अध्यक्ष श्री अमोल सिरसट व तालुकाध्यक्ष श्री बबलू भोईटे व विभागप्रमुख श्री सुनीलराव मिसाळ यांचे हस्ते करण्यात आले. या शाखेचे शाखाध्यक्ष म्हणून श्री संकेत नलावडे यांची तर उपाध्यक्ष श्री बबलू यमगर व श्री जितेंद्र नलावडे तर सचिव श्री बालाजी चौरे कार्याध्यक्ष श्री खंडू गायकवाड कोषाध्यक्ष श्री तात्यासाहेब करवर प्रसिद्धी प्रमुख श्री शंकर मोरे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. हलग्यांच्या निनादात व प्रचंड घोषणाबाजी देत शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत समितीच्या शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष श्री अमोल सिरसट उपाध्यक्ष श्री हनुमंत यादव सचिव श्री आकाश भोसले कार्याध्यक्ष श्री मनोज मोरे तालुकाध्यक्ष श्री बबलू भोईटे शहराध्यक्ष श्री संतोष घोरपडे शहर उपाध्यक्ष श्री भैरवनाथ रणखांब रिक्षा समिती अध्यक्ष श्री तुशाल सूर्यवंशी श्री धर्मराज सूर्यवंशी श्री हनुमंत तांबे सर कुणाल जानराव अमीन दस्तगीर हमीद पटेल मयूर वाळवे दीपक कदम संदीप नलावडे श्रीराम पंडित कान्हा माळी शंकर विधाते अनिल कदम पिंटू सरडे गोकुळ पवार अमर मस्के गोविंद यादव गणेश कदम बाबा शेख नामदेव भुसनर अक्षय नलावडे बालाजी गायकवाड महमूद शेख दिलदार पठाण यासह शेकडो समितीचे मावळे पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top