धाराशिव (प्रतिनिधी)- शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय च्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या 375 व्या स्मृतीदिनानिमित्त धाराशिवकरांसाठी दि. 4 आणि 5 नोव्हेंबरला सांस्कृतिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले असून 4 नोव्हेंबरला 'तुका झालासे कळस..!' तर 5 नोव्हेंबरला 'तुका आकाशाएवढा..!' हे दोन कार्यक्रम होणार आहेत. नामवंत कलाकार कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, गणेश शिंदे इत्यादी दिग्गज कलाकार यानिमित्ताने धाराशिवला हाजरी लावणार असून या दोन्ही कार्यक्रमांचे नागरिकांसाठी अगदी मोफत आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन सांस्कृतिक आघाडीचे जिल्हा संयोजक युवराज नळे यांनी केले आहे.