धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मान्यतेने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या सहकार्याने भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडी जिल्हा संयोजक युवराज नळे यांनी धाराशिव जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित केली आहे.
भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडी जिल्हा धाराशिव कार्यकारिणी पुढील प्रमाणे.
कार्याध्यक्ष - कमल चव्हाण, उपाध्यक्ष - विशाल टोले, उपाध्यक्ष - दर्शन सुरवसे, उपाध्यक्ष - डॉ सत्यवान गोरे, सरचिटणीस - मल्लिकार्जुन साखरे, सरचिटणीस - संग्राम बनसोडे, सरचिटणीस - अमर सुपेकर, चिटणीस - शहाजी राठोड, चिटणीस - चंद्रकांत धुर्वे, चिटणीस - तुकाराम वाडकर, कोषाध्यक्ष - राजेश शिंदे, प्रसिद्धी प्रमुख - अजित खापरे, का. सदस्य - सुशील ढोबळे, का. सदस्य - दयानंद पांचाळ, का. सदस्य - अनिता विधाते, का. सदस्य - संजीव कांबळे, का. सदस्य - बिभीषण पवार, का. सदस्य - योगेश वाघमारे, का. सदस्य - प्रकाश मडके.
धाराशिव जिल्ह्याला मोठी सांस्कृतिक परंपरा असून भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याची सांस्कृतिक चळवळ रुजविण्याचे व वाढविण्याचे कार्य या कार्यकारिणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होईल असा विश्वास युवराज नळे यांनी व्यक्त केला. नवीन कार्यकारिणीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, अमित शिंदे व सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.