परंडा (प्रतिनिधी)- माजी मंत्री भूम-परांडा-वाशी मतदार संघाचे आमदार डॉ.प्रा.तानाजी सावंत हे शुक्रवार दि.7 रोजी पासून परंडा - भूम - वाशी मतदार संघात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर असून परंड्याचे माजी नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांच्या निवासस्थानी उपस्थितीत राहून पदाधिकारी,कार्यकर्तेसह उपस्थित हजारो मतदारास मार्गदर्शन करित विरोधकावर जोरदार हल्ला चढविला विरोधक एकत्र आले तरी आपणास काही फरक पडणार नाही असे म्हणत त्यांनी मी तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका साम दाम दंड वापरून विरोधकांचे आमानत रक्कम जप्त करून वीस नगसेवक सह जाकीर भाई तुम्ही नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत बहूमताने निवडून येणार मला पूर्ण खात्री आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांनी विरोधकावर जोरदार प्रहार करित माझ्या विरोधात शहरातील विरोधक सर्व पक्ष एकत्र आले असून त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लडवून दाखवावी असे खुले आव्हान केले.तसेच शहशतील वीस नगरसेवकासह व मी स्वःता नगराध्यक्षपद निवडूण आणून दाखवून विरोकांचे अनामत रक्कम जप्त केल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही. माझ्या पाठीशी परंड्यातील जनता व आमदार सावंत आहेत. त्यामुळे विकास कामाला गती मिळणार आहे.
परंडा शहरात आमादर सावंत यांनी कोट्यवधी रुपयांची निधी आणून विकासकामे केली आहेत आणि या विकासकामांच्या बळावर जनता नक्कीच निवडणुकीत शिवसेना ( शिंदे गटाला ) बहुमताने विजयी करेल असे मत सौदागर यांनी यावेळी व्यक्त केले. या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख,परंडा शहर प्रमुख यांच्यासह शिवसेना, युवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते मतदार आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
