कळंब  (प्रतिनिधी)- कळंब नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. नगर परिषद क्षेत्रातील २० ,९ ५८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, त्यात १०७१३ पुरुष, १०२४५ महिला मतदार आहेत. मतदानासाठी शहरात २४ ठिकानी मतदान  केंद्रे निश्चित केली आहेत. नामनिर्देशन दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असली तरी दुसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर, छाननी १८ नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची मुदत १९ ते २१ नोव्हेंबर, चिन्ह वाटप २६ नोव्हेंबर, मतदान २ डिसेंबर, आणि मतमोजणी ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता होईल.

या निवडणुकीत १० प्रभागांमधून प्रत्येकी दोन सदस्य निवडले जातील, म्हणजे एकूण २० नगरसेवक निवडले जातील. तसेच थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी खर्च मर्यादा ७ लाख ५० हजार, नगरसेवकपदासाठी  २ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. उमेदवारांनी दररोजचा खर्च निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येईल, तसेच  सेतू सेवा केंद्रे आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे सभा रेकॉर्डिंग करण्यासाठी व्ही .एस .टी . तीन पथक चेक पोस्ट साठी एफ . एस . टी .तीन पथक , धाड पथक एस . टी . टी . तीन पथक असे एकूण नऊ पथकाची निर्मिती या नगरपरिषद निवडणुकीसाठी करण्यात आलेली आहे . शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी कार्यालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात फक्त दोन व्यक्तींना प्रवेश असेल. निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत ढोकले,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मंजुषा गुरमे ,अजित काकडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा आणि मतदानाचा हक्क बजवावा. 

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top