धाराशिव (प्रतिनिधी)- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे धाराशिव तालुक्यातील वरूडा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या  मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन मंगळवारी दि.25 नोव्हेंबर रोजी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, जिल्हा कोषागार अधिकारी अर्चना नरवडे, प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी प्रकाश पारवे उपस्थित होते.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांच्या अध्यक्षतेखाली अणि विशेष अतिथी तथा आदिवासी पारधी महासंघाचे  प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी वरूडा गावच्या सरपंच मीराताई गाढवे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे कनिष्ठ  शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर भांगरे, संशोधन सहायक मनोहर पाटील, आदिवासी विकास निरीक्षक काशिनाथ राख, भागवत आंधळकर, विशाल सरतापे, राजन चव्हाण नाना काळे, वैशाली गंगावणे आदींची उपस्थिती होती. 

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांनी आश्रमशाळेला सुपुर्द  केला. या पुतळ्याचे अनावरण जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत 3 शासकीय व 2 अनुदानित आश्रमशाळेतील एकूण 320 विद्यार्थी खेळाडूच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा 2025 - 26 या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वरूडा येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विशाल सरतापे यांनी केले. या कार्यक्रमास   शालेय व्यवस्थाप समितीचे उपाध्यक्ष नाना काळे, तसेचय शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कोंढारे यांनी केले आहे.


 
Top