वाशी (प्रतिनिधी)-  तालुक्यातील तांदळवाडी येथे भैरवनाथ शुगर मिल्स लिमिटेडचा बारावा गळीत हंगाम मोळीपूजन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शेतकरी बांधव व मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक विधीनुसार कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत, व्हाईस चेअरमन केशव उर्फ विक्रम सावंत, संचालक मंडळ तसेच पदाधिकारी यांनी मोळीचे पूजन करून नव्या हंगामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्हाईस चेअरमन केशव सावंत यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला विक्रम भाव मिळेल असे सांगितले. 

या प्रसंगी बोलताना व्हाईस चेअरमन केशव उर्फ विक्रम सावंत यांनी सांगितले की, आमदार तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ शुगर मिल्स नेहमीच शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देते. यंदाही आमदार सावंत शेतकऱ्यांचा विश्वास कायम ठेवत इतर सर्व कारखान्यांपेक्षा अधिक उसाचा दर जाहीर करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

कार्यक्रमाला शिवसेना वाशी तालुकाप्रमुख सत्यवान गपाट, निचित चेडे, नागनाथ नाईकवाडी, प्रसाद जोशी, युवासेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, शिवहार स्वामी, शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर, युवासेना तालुकाप्रमुख प्रवीण गायकवाड, दिनकर शिंदे, अतुल चौधरी, अशोक लाखे, उद्धव साळवी तसेच कारखान्याचे सर्व संचालक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 

 
Top