धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील भाजपचे नेते माजी नगरसेवक तथा माजी शहराध्यक्ष संभाजी सलगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला.
आपणास नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाही मिळाली. त्याप्रमाणे प्रभागामध्ये नगरसेवक पदाची उमेदवारी मिळेल असे असताना निष्ठावंतांना ठावलून इतरांना उमेदवारी दिली. अशी टिका संभाजी सलगर यांनी भाजपवर केली. जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनी संभाजी सलगर यांना पक्षात सन्मानाचे स्थान मिळेल असा विश्वास दिला. त्यांच्या राजकीय अनुभवाचा निश्चित आम्हाला फायदा होणार असल्याचे आमदार पाटील म्हणाले. सलगर यांच्या सोबत अजय नाईकवाडी, अविनाश शाबादे, महेश शिंदे, महाडिक, राहुल सलगर, देशमाने नंदकुमार, काकाजी अंकुश, राजेंद्र शिंदे, रामचंद्र कसबे, महेश नरवडे, विवेक मुळे, ऋषिकेश कपाळे, पोपट कासार, आर्यन सलगर, गौरव सलगर, भोलेनाथ मधुरकर, नागेश मधुरकर, नवनाथ शेरकर, लखन शेरकर यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रवीण कोकाटे, सोमनाथ गुरव, संग्राम देशमुख, बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे, तानाजी जाधवर, पंकज पाटील, अभिजित देशमुख, हनुमंत देवकते, सिद्धेश्वर कोळी, गणेश खोचरे, राज निकम, परवेज काझी, मनोज पडवळ, महेश लिमये, पंकज स्वामी, गफूर शेख आदी उपस्थित होते.
