तेर (प्रतिनिधी )राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र पुणे आयोजित शिक्षक व अधिकारी /कर्मचारी यांच्या विविध गुण कौशल्ये सादरीकरणासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या .त्यामध्ये जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा तेर च्या शिक्षिका सुनिता माने यांची योगासन स्पर्धेमध्ये धाराशिव तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला व त्यांची निवड विभागीय स्तरावर करण्यात आली आहे .त्याबद्दल सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
