धाराशिव (प्रतिनिधी)- स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या अधिपत्याखाली नाशिक जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेच्या वतीने नाशिक येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय इनलाईन हॉकी स्पर्धेत वरिष्ठ पुरुषाच्या गटातून धाराशिव जिल्ह्याच्या संघाने सिल्वर मेडल पटकावले वेगवेगळ्या वयोगटातून जिल्ह्यातील 19 जणांची राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी राज्याच्या संघात निवड झाली आहे.
भारतीय रोलर स्केटिंग महासंघाच्या अधिपत्याखाली आंध्र प्रदेश राज्य रोज स्केटिंग संघटनेच्या वतीने विशाखापटनम येथे 5 ते 15 डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धा होत आहेत. स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेच्या वतीने नाशिक येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रोलर हॉकी व इनलाईन हॉकी स्पर्धेतून ही निवड झाली आहे.
रोलर हॉकी प्रकारात 6 ते 9 वर्ष मुलांच्या वयोगटातून नमन गडदे, जय सुपेकर व 9 ते 12 वर्षे मुलांच्या वयोगटातून श्रीलेश शिंदे यांची तर इनलाईन हॉकी प्रकारात 9 ते 12 वर्षे मुलींच्या वयोगटात रुही चौरे, स्वरा जवळीकर, गौरवी शिरसाळकर, 12 ते 15 मुलींच्या वयोगटातून आराध्या धस, संस्कृती बोराडे, आरफिया पटेल, अनुष्का शानमे, मुलातून प्रणव पाटील, प्रतिक हिरोळे, 15 ते 18 मुलांच्या वयोगटातून प्रथमेश शिंदे, आदिराज पवार तर वरिष्ठ गटातून अजिंक्य जाधव, अमित बहिरे, अभिजीत कंदले, वेदांत गरजे, साई राठोड यांची महाराष्ट्र संघात निवड झाली असून खेळाडूंना धाराशिव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक प्रवीण गडदे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, स्पर्धा विभाग प्रमुख प्रताप सिंह राठोड, सचिव कैलास लांडगे, यशोदीप कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
