धाराशिव (प्रतिनिधी)- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण),जिल्हा परिषद धाराशिवअंतर्गत अंगणवाडी  मदतनीस या मानधनाधिष्ठित पदांच्या भरतीसाठी संबंधित गावातील पात्र महिला उमेदवारांकडून 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज भर्ती पोर्टल http:// bhartiportal.zpdharashiv.in येथे 5 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत स्वीकारले जाणार असून, ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट प्रकल्प कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा वा मुलाखत होणार नाही.शासन निर्णय दि.30 जानेवारी 2025 मधील गुणदान पद्धतीनुसारच उमेदवारांची गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे. धाराशिव (ग्रामीण) प्रकल्पांतर्गत झरेगाव,केशेगाव,महाळंगी,सारोळा (बु.) अशा एकूण 4 ठिकाणी अंगणवाडी मदतनीस पदांसाठी प्रत्येकी 1 पद रिक्त आहे.

शैक्षणिक पात्रता : किमान इयत्ता बारावी उत्तीर्ण.उच्च शिक्षणालादेखील गुणदान. फक्त संबंधित गावातील (महसुली हद्द) महिला पात्र असतील.तहसीलदार यांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्षे आहे. तर विधवा उमेदवारांसाठी 40 वर्षे अशी निश्चित केली आहे.लहान कुटुंबाचा दाखला आवश्यक आहे. आरक्षण प्रवर्गानुसार जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्र आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.प्राप्त अर्जांतील कागदपत्रांच्या गुणवत्तेनुसार निवड केली जाईल. अंतिम निवड सूचीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी पूर्ण केल्यानंतर नियुक्ती आदेश दिले जातील.30 दिवसांत रुजू न झाल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारास संधी मिळेल. प्रतीक्षा यादी एक वर्ष वैध राहील. पंचायत राज संस्थेचे सदस्य असतील तर नियुक्तीपूर्वी राजीनामा आवश्यक. भरती प्रक्रियेदरम्यान कोणताही दबाव आणल्यास उमेदवारी रद्द होईल.जाहिरात दुरुस्ती किंवा रद्द करण्याचे अधिकार प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण), धाराशिव यांचेकडे आहे.


 
Top