तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल कराच्या शेवटच्या दिवशी सोमवार दिनांक 17 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 10 उमेदवाराचे 14 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. नगरपरिषद सदस्य पदासाठी उमेदवाराचे 101 अर्ज प्राप्त झाले आहेत.10 ते 17 नोव्हेंबर दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी एकूण एकूण 24 अर्ज दाखल झाले असून,सदस्य पदासाठी एकूण 242 अर्ज प्राप्त झाले आहेत.
तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक साठी सोमवार दि.17 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी - उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. आज अखेरचा दिवस असल्याने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. नगराध्यक्ष पदासाठी 24 नगरसेवक पदासाठी 24 2 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
13 नोव्हेंबर-1, 14 नोव्हेंबर- 6,15 नोव्हेंबर- 56, 16 नोव्हेंबर- 78, 17 नोहेबर- 101 असे आजपर्यंत एकूण 242 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक कार्यालयातून मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी महंत तुकोजी बुवा भाजप/तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आघाडी.महंत इच्छागिरी गुरुदेव महादेव गिरी महाराज भाजप /अपक्ष.माजी नगराध्यक्ष विनोद गंगणे भाजप /अपक्ष. अमर मगर काँग्रेस. सचिन रोचकरी भाजप / अपक्ष. अमोल कुतवळ काँग्रेस . देवानंद रोचकरी शिवसेना शिंदे गट. सज्जन साळुंखे भाजप/ तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आघाडी. उत्तम अमृतराव शेकाप. अविनाश पवार अपक्ष. बालाजी कोमटे अपक्ष.दत्तात्रय कदम आरपीआय आठवले गट, कृष्णा देवानंद रोचकरी समाजवादी पार्टी, संदीप अर्जुन शिरसाट अपक्ष, विजय शामराज अपक्ष, किरण बाबुराव कुलकर्णी अपक्ष, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महंत इच्छागिरी गुरू महादेव गिरी महाराज व महंत तुकोजी बुवा यांची उमेदवारी शहरात चर्चेत ठरले आहे. या दोन्ही महंतानी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत हे विशेष आहे.