धाराशिव (प्रतिनिधी)-  नगर परिषद धाराशिव सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून वैध ठरलेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी दि.21 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवारांनी नगर परिषद धाराशिव येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे स्वतः किंवा सूचकामार्फत उपस्थित राहून जोडपत्र5 भरून माघार प्रक्रिया पूर्ण करावी. नगर परिषद धाराशिव सार्वत्रिक निवडणूक 2025 नामनिर्देशन पत्र (उमेदवारी) छाननी मध्ये वैध झालेल्या उमेदवार याचे माघार घेण्यासाठीदि.21 नोव्हेंबर 2025 दुपारी 3 वाजतापर्यंत वेळ असून निवडणुकीतून माघार घेण्यास इच्छुक उमेदवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद धाराशिव येथे स्वतः / सूचकामार्फत उपस्थितीत राहून  (जोडपत्र 5) भरून द्यावे.असे निवडणूक निर्णय अधिकारी,नगर परिषद तथा उपविभागीय अधिकारी, धाराशिव यांनी कळविले आहे.

 
Top