भुम (प्रतिनिधी)- जेएसपीएम पुणे संचलित बार्शी येथील भगवंत अभियांत्रिकी महाविद्यालय (बीआयटी कॉलेज ) मध्ये "TECH-BIT 2K25 " हा एकदिवसीय तांत्रिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता.या महोत्सवाचे उदघाटन संकुल संचालक ऋतुराज सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ.एच.व्ही.शेटे सर यांनी इव्हेंट बाबत माहिती देताना आयोजनामागचा उद्देश सांगितला.तर आपल्या अध्यक्षीय भाषणात ऋतुराज सावंत यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनबाबत सर्वांचे कौतुक करताना भविष्यात देखील विद्यार्थ्यांच्या सुप्त प्रतिभेला चालना व सादरीकरणाला व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातील याची ग्वाही दिली.
एकूण 600 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले कौशल्य दाखविले.त्यामध्ये स्वेरी कॉलेज ,सिद्धेश्वर वूमन्स पॉलीटेक्नीक, एन बी नवले सिंहगड कॉलेज ,के.टी .पाटील कॉलेज ,श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, बिगसी कॉलेज ,वि.जे.शिंदे पॉलीटेक्नीक ,व्ही.व्ही.पीआयटी ,बीएमआयटी, इत्यादी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते .
रोबो रेस मध्ये डिप्लोमधून बीआयटीच्या आदेश गवळी प्रथम क्रमांक ,वेदांत गरड द्वितीय क्रमांक ,रोहित भुसारे तृतीय क्रमांक यांनी यश मिळविले तर डिग्रीमध्ये गीतांजली स्वामी आणि ग्रुप यांनी यश मिळविले मॉडेल मेकिंग डिप्लोमामध्ये रत्नदीप खरावने प्रथम क्रमांक मिळविला तर अनुष्का कोकाटे आणि ग्रुप व वैभवी कांबळे व ग्रुप ने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. तर डिग्रीमध्ये बीआयटीच्याच काटबु संजना आणि ग्रुप ,काझी ताझिला व ग्रुप,शेख तरन्नुम व ग्रुप यांनी अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. ब्लाइंडकोड मध्ये बीआयटीच्या सुफिया शेख प्रथम क्रमांक,सानिया पठाण द्वितीय क्रमांक शिवम स्वामी तृतीय क्रमांक मिळविला,सर्किट सुडोकू मध्ये डिप्लोमा विभागात मोरे आदित्य सिंहगड कॉलेज प्रथम क्रमांक ,तर बीआयटीच्या शाहिदरझा बागवान द्वितीय क्रमांक यश वाघमारे तृतीय क्रमांक यांनी यश मिळविले तर डिग्रीमध्ये सिंहगड कॉलेजच्या सुरज पोगूळ याने प्रथम तर बीआयटीच्या संतोषी राऊत व प्रणव धस यानि अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला, मिरर कोड या प्रकारात व्ही.व्ही.पी.ची समृद्धी बाबर ,प्रथम क्रमांक तर बीआयटीच्या प्रथमेश कुंभार व अल्फा शेख यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला ब्लाइन्ड सी मध्ये रुचा साळुंके संगमेश्वर कॉलेज प्रथम क्रमांक ,तर बीआयटीच्या धीरज वीर व स्नेहा सोनवणे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले आयडियाथॉन (पोस्टर प्रेझेंटेशन),डिप्लोमामध्ये बीआयटीच्याच गायत्री बारगजे प्रथम क्रमांक,आदित्य सातपुते द्वितीय क्रमांक, तर आल्फीया शेख तृतीय क्रमांक मिळविला,तर डिग्रीमध्ये चारकपल्ली गायत्री एस.इ.एस कॉलेज प्रथम क्रमांक,पियुष चोपडे द्वितीय क्रमांक सायली कानडे तृतीय क्रमांक मिळविला,तर बीजीएमआय मध्ये संतोष वाघोलीकर याने यश मिळविले.
यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात रोख रक्कम ,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली यामध्ये एकूण 2 लाखापेक्षा जास्त रकमेची बक्षिसे वितरित करण्यात आली.सहभागी विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची सोय महाविद्यालयाकडून करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का जाधव व सागर वाघमारे या विद्यार्थ्यांनी केले तर सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.अर्चना आवटे मॅडम यांनी सहसंयोजक प्रा.वाघमारे सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केलेल्या परिश्रम व सहकार्याबद्धल आभार व्यक्त केले.