उमरगा (प्रतिनिधी)- सधम्माचे आचरण करणे प्रत्येक बौद्धाचे कर्तव्य आहे. शिलाचरण, कुशल कर्म करून चित्त शुद्ध करावे, मनाची मलिनता काढण्यासाठी विहारात जाऊन ध्यान करावे. सब्ब पापस अनुकरण, कुसलस, उपसंपदा या धम्मपदातील गाथेप्रमाणे कुशल कर्म केल्याने चित्ताची शुद्धी होते. असे प्रतिपादन लातूर येथील प्रा.देवदत्त सावंत यांनी केले.
तालुक्यातील येळी येथील वैशाली बुद्ध विहारात रविवारी वर्षावास समारोपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास भन्ते सुमंगल, दिलीप भालेराव, आनंदकुमार कांबळे, कॅप्टन निखिल गायकवाड, संतोष सुरवसे, धम्ममित्र अजिंक्य मुरूमकर, दिलीप गायकवाड, आदींची उपस्थिती होती. प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भन्ते सुमंगल यांच्या हस्ते करण्यात आले. भन्ते सुमंगल यांच्या नेतृत्वाखाली धम्म रॅली काढण्यात आली. रॅलीत बुद्धगया येथील महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा 1939 रद्द करा, आशा आशयचे फलक घेऊन गावातील प्रमुख रस्त्यानी रॅली काढण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिकदलाचे कार्यकर्ते, धम्म अनुयायी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास नंदा कांबळे, पदमीनी कांबळे, बब्रुवान कांबळे, प्रा.महेंद्र कांबळे, अजय कांबळे, संदीपान कांबळे, अभिमन्यू कांबळे, विनायक कांबळे, विक्रम कांबळे, नागनाथ कांबळे, सुनील कांबळे आदींनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.जी.एस. सुरवसे यांनी केले. तर सुत्रसंचालन प्रमोद कांबळे यांनी केले.