तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचालित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदत देण्यात आली.
या उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून व सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये आपले एक दिवसाचे वेतन रुपये सत्यान्नव हजार एकशे त्रेसष्ट रकमेचा धनादेश मा. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार सुपूर्द करण्यात आले. या वेळी माया माने तहसीलदार तथा व्यवस्थापक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, प्राचार्य डॉ.ओमप्रकाश राजनकर, तसेच प्रा. डॉ. गणेश मोटे उपस्थित होते.