तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे महाराष्ट्र संत विद्यालय येथे इयत्ता दहावी सन 1998 -99 च्या माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन वृक्षारोपणासह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रात विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के.बेद्रे होते तसेच विद्यालयातील माजी शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुरुवात माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेस भेट म्हणून दिलेल्या संतांच्या मूर्ती व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. माजी विद्यार्थ्यां तर्फे सर्व गुरुजनांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या आवारात वृक्षारोपण केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवहार कोरके व बळीराम भंडारे यांनी केले.माजी विद्यार्थिनींनी संगीत खुर्चीचा आनंद घेतला व विजेत्या विद्यार्थिनींना पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय जाधव ,अरुण कोळेकर, गणेश व्हरकटे ,विकास खोडवे, शिवहार कोरके, कविता सोमानी, बळीराम भंडारे ,अशोक पवार ,नारायण साळुंखे, नवनाथ पांचाळ आदींसह सर्व माजी विद्यार्थ्यांनी मदत केली.
