उमरगा (प्रतिनिधी)-  तालुक्यातील कराळी येथील दि लॉर्ड बुद्धा रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या कपिलवस्तू परिसरातील बौद्ध विहारात वर्षावास समरोपाचा व समाज कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ श्रीकांत गायकवाड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भन्ते सुमंगल, धम्मानुयायी संघ पुणेचे अध्यक्ष अडँ अनिलकुमार बस्ते,धम्मचारी प्रज्ञाजित, ट्रस्टचे कोषाध्यक्ष कैलास शिंदे, उपाध्यक्ष एम. एस. सरपे, बोधिसत्वचें अध्यक्ष सुभाष काळे,विश्वास पंडागळे,जयश्री शिवलाल कांबळे,दिलीप परिहार पाटील,बळीराम गरड, प्रा डॉ संजय गायकवाड,लताताई गायकवाड,आदींची उपस्थिती होती.

पहिल्या सत्रात भन्ते सुमंगल यांच्या हस्ते धम्मध्वज फडकविण्यात आला.समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर धम्मचारी प्रज्ञाजित, अनिलकुमार बस्ते, श्रीकांत गायकवाड यांनी धम्माला अनुसरून मार्गदर्शन झाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा मनोजकुमार गायकवाड, जयश्री गायकवाड यांनी केले. प्रस्तावित सुधीर कांबळे यांनी केले आभार बालाजी गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास पुणे येथील धम्मानुयायी संघाच्या महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.बोधिसत्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता प्रा संतोष सुरवसे,प्रा संजीव कांबळे,राहुल कांबळे,बाबासाहेब जाधव,कुमार कांबळे,प्रा नागनाथ गायकवाड, प्रा रमेश जकाते,दत्तात्रय सोनकांबळे,तानाजी कांबळे, बालाजी सुरवसे, दिगंबर गायकवाड ,बलराज हिप्परगे हिरालाल गायकवाड ,संजय कांबळे आदींनी पुढाकार घेतला होता.

 
Top