धाराशिव (प्रतिनिधी)-  अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाचे ऑनलाइन सभा 12 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज गुर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत काही महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. टीईटी प्रकरण व जुनी पेन्शन योजनेसाठी 24 नोव्हेंबरला जंतरमंतरवर करणार धरणे आंदोलन लाखो शिक्षकांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सेवेत असणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी ज्यांची सेवा 5वर्षापेक्षा जास्त शिल्लक आहे त्यांना तसेच पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली आहे. दोन वर्षात परीक्षा उत्तीर्ण  न झाल्यास सेवा मुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

याविरुद्ध संघटनेने पुनर्विचार याचिका 25 सप्टेंबर रोजी दाखल केली आहे. याचबरोबर विविध आंदोलनाच्या माध्यमातून शासन प्रशासनावर दबाव निर्माण करण्यात येत आहे. या विरोधात आंदोलनाचं हत्यार संघटनेने उपसले आहे.24 नोव्हेंबर रोजी देशभरातील प्राथमिक शिक्षक जुनी पेन्शन योजना व टिईटी  या दोनच विषयी जंतर-मंतरवर  धरणे आंदोलन करणार आहेत. यानंतर ही याचा फेरविचार नाही झाला तर फेब्रुवारी मध्ये होणार जेलभरो, यानंतर संसदेच्या फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या अधिवेशन कालावधीत देशभरातील लाखो शिक्षक संसदेला घेराव घालून जेलभरो आंदोलन करणार आहेत.

यापूर्वी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने पंतप्रधान व केंद्रीय शिक्षणमंत्री यांना तसेच मुख्यमंत्री यांना याप्रश्नी शासनाने हस्तक्षेप करावा म्हणून निवेदन दिले आहे.व राज्य भर स्वाक्षरी मोहीम राबवली. सदर धरणे आंदोलनाला जिल्ह्यातून हजारो शिक्षकानी उपस्थित राहावे असे आवाहन राज्य उपाध्यक्ष श्रलालासाहेब मगर, जिल्हाध्यक्ष बशीर तांबोळी यांनी केले आहे.

 
Top