मुरूम (प्रतिनिधी)- केसरजवळगा, ता. उमरगा येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत रोटरी क्लब मुरूम सिटीचे माजी सचिव रोटे. सुनिल राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे शालेय साहित्याचे वाटप मंगळवारी (ता. 13) रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप पाटील होते.
यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कल्लापा पाटील उपस्थित होते. सहशिक्षक सुनिल राठोड यांचा प्रशालेच्यावतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धम्मभूषण कांबळे यांनी आपल्या सुमधूर आवाजात मैत्रीगीत सादर करून एकतेचा संदेश दिला. शाळेतील 250 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन एक नवा पायंडा राठोड यांनी घातला. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढदिवसाचे प्रस्थ असताना अवांतर खर्चाला फाटा देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मदत देऊन मुलांच्या चेहऱ्यावर समाधान आणण्याचे काम केल्याची भावना यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी भोसले यांनी व्यक्त केली. यावेळी गोविंद पाटील, मल्लिकार्जुन बदोले, संतोष कांबळे, कमलाकर मोटे, शिवा स्वामी, उपसरपंच जयपालसिंग राजपूत, माजी उपसरपंच शिवशंकर कणमुसे, अझहर इनामदार, माजी पोलीस उपनिरीक्षक राम कांबळे, तंटामुक्त समिती उपाध्यक्ष बिरबलसिंग राजपूत, गैभूशा मकानदार, बालाजी डिगोळे, चंद्रकांत कुंभार, विशाल गायकवाड, मल्लीनाथ स्वामी आदींची उपस्थिती होती. यावेळी मुरूमच्या कॉर्नर स्टील सेंटरचे शरणाप्पा धुम्मा यांच्याकडून पहिलीच्या 40 विद्यार्थ्यांना टिफीन बॅगचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी संजीव भोसले, गजानन खमीतकर, महादेव कुनाळे, साधना ताशी, वैभव पाटील, बालाजी डिगोळे, ज्योती जाधव, शुभांगी घोडके आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी भोसले तर आभार सचिव कल्लप्पा पाटील यांनी मानले.