भूम (प्रतिनिधी)- महिला नगराध्यक्ष सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सुटल्याने शहरातील कार्यकर्त्याकडून माजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या उमेदवारीची मागणी झाल्याने दि. 13 ऑक्टोंबर रोजी झालेल्या संवाद बैठकीतून जनतेचे आशीर्वाद घेऊन गाढवे दापत्याने भूम नगरपालिकेच्या निवडणुकचा चौकार मारण्यासाठी रणशिंग फुंकले आहे.
गेल्या 23 वर्षापासून भूम शहरातल्या प्रत्येक नागरिकांच्या सुख दुःखात मी तन-मन धनाने सेवा करत असून, या 23 वर्षाच्या सेवेचे फळ म्हणून शहरातील नागरिकांनी आलम प्रभू विकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने आशीर्वादरुपी मतदान करून निवडून द्यावे. असे आवाहन माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी संवाद बैठकीच्या दरम्यान केले आहे.
दि. 12 ऑक्टोंबर रोजी शहरातील पोदार स्कूलच्या प्रांगणात शहरातील गाढवे परिवाराला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची, नागरिकांची, व्यापाऱ्यांची संवाद बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मागील 23 वर्षाच्या काळामध्ये शहरातील झालेल्या विकास कामांची माहिती कार्यकर्त्यांच्या मनोगतातून व्यक्त करण्यात आली. शहरातील सर्व समाजाच्या मंदिराचे सभागृहाचे काम केले असल्याचे यावेळी सांगून जातीय सलोखा राखण्यासाठी पुन्हा संधी द्यावी. यावेळी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना नगराध्यक्ष पदासाठी कुणाला उभे करायचे असे विचारले असता कार्यकर्त्यांनी माजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या नावाची कार्यकर्त्यांमधून मागणी झाल्याने यावेळी थेट नगराध्यक्षपदाची जनतेमधून निवड असल्याने जनतेने चालू असलेली विकासाची गंगा पुढे नेण्यासाठी व भूम शहर हे विकासनशील म्हणून सर्व महाराष्ट्र व भारतभर ओळखण्यासाठी पुन्हा गाढवे परिवाराला व आलम प्रभू शहर विकास आघाडीला संधी देण्याची विनंती गाढवे यांनी केली .यावेळी हभप अरुण शाळू, हभप सोमनाथ बाबर,आलिम शेख,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गाढवे,प्रतिष्ठित व्यापारी शितल शहा,अंबादास वरवडे, ॲड संजय शाळू, ॲड ईश्वर रांजवण,माजी सैनिक संघटनेचे पोपट जाधव,प्रभाकर हाके ,लक्ष्मण पौळ हाजी बाबा पटेल ,संजय साबळे उपस्थित होते. दि. 12 ऑक्टोबर रोजी शहरातील नागरिकांची बैठक झाली. तर पुढील येणाऱ्या रविवारी दि. 19 ऑक्टोंबर रोजी शहरातील महिलांची बैठक होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.