धाराशिव (प्रतिनिधी)-  अरविंदनगर (केशेगांव) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याच्या 22 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ ॲड. चित्राव अरविंदराव गोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सी. रुपाली चित्राव गोरे व राजेंद्र बाळासाहेब पाटील यांचे शुभहस्ते विधीवत पुजा होवुन संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कारखान्याचे संस्थापक चेअरमन अरविंद गोरे हे होते.

सदर प्रसंगी ॲड. चित्राव गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कारखान्याच्या चाचणी गळीत हंगाम 2001 पासुन आजपर्यंत कारखाना हा कठीण परिस्थितीवर मार्ग काढत चालत असून, गळीत हंगाम 2025-26 करिता ऊसाचा 8000 मे.टन ऊस पुरवठा होईल इतकी तोड/वाहतुक यंत्रणा कारखान्याने भरती केलेली प्रति दिन 6000 मे. टनाने गळीत करुन 150 दिवस कारखाना चालेल असे सांगितले. 

सदर प्रसंगी कारखान्याचे संस्थापक चेअरमन अरविंद गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने अडचणीत आले आहेत. सहकारी कारखाने 99 व खाजगी कारखाने 101 असुन खाजगी कारखाने विक्री करणे, परत बंद पाडणे व परत विक्री करणे असे व्यव्हार चालु आहेत. आपल्या जवळ सत्ता नाही, पैसा नाही आणि आपल्याला कोणाचा अधार नाही. आभार प्रदर्शन कारखान्याचे संचालक निलेश पाटील यांनी केले. बॉयलर अग्नीप्रदिपन कार्यक्रमास सर्व संचालक मंडळ, सभासद शेतकरी, ऊस तोड/वाहतूक ठेकेदार, हितचिंतक, अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top