मुरुम (प्रतिनिधी) -   दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर यांच्या अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागा द्वारे भारतीय वायु सेना दिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी एनसीसी विभागाचे कॅप्टन चिट्टमपल्ले ज्ञानेश्वर यांनी या दिवसाच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .8 ऑक्टोबर हा दिवस सैन्य दलातील तीन दलातील एक दल म्हणजे वायु सेना दिवस होय .या दिवसाचा दुसऱ्या जागतिक महायुद्धा पासूनचा ऑपरेशन सिंदुर पर्यंतच्या भारतीय वायु सेना दलातील शौर्यचा , पराक्रमाचा इतिहास सरांनी सांगितला .

भारतीय वायुसेनेनी केलेली प्रमुख ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन सफेद सागर, ऑपरेशन पुमलाई, ऑपरेशन बालाकोट आणि ऑपरेशन सिंदूर होय या मध्ये ऑपरेशन सफेद सागर 1999 च्या कारगिल युध्दाच्या वेळी केलेला महत्वपूर्ण अभियान होय .

प्रत्येक वर्षी 8 अक्टोबर  भारतीय वायु सेना दिवस म्हणुन साजरा केला जातो . हा दिवस भारतीय वायु सेना चा स्थापना दिन आणि देशासाठी युद्धात ज्यांनी वीर मरण ,बलिदान देणाऱ्या सैनिकांचा हा सम्मान आहे या वर्षी 93 वां समारोह गाजियाबाद च्या हिंडन एयर फोर्स स्टेशन वर आयोजित केला जात आहे . भारतीय वायु सेना जगातील  सर्वात ताकतवर वायु सेना मध्ये अव्वल मानले जाते . या साठी एनसीसी कैडेटसनी भारतीय सैन्य दलातील वायु सेनेत भरती होऊन देशाची सेवा करावी असे सरांनी आपल्या भाषणात सांगितले . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले , डॉ विलास इंगळे , डॉ पदमाकर पिटले , डॉ हिस्सल , डॉ रेवते , नितीन कोराळे सर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅडेट प्रमोद सुनगार सुत्रसंचलन कॅडेट भोसले रंजना आभार कॅडेट पंकज जमादार यांनी केले .

 
Top