धाराशिव (प्रतिनिधी)-अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाकडून कर्ज घेतलेल्या उद्योजकांना व्याज परतावा वेळेवर द्यावा तसेच नवीन उद्योजकांना पोर्टल बंद असल्यामुळे नोंदणी करता येत नाही. या समस्या दूर करून नवउद्योजकांसमोरील अडचणी दूर कराव्या अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजातील उद्योग करू पाहणारे जे मराठा युवक या महामंडळांंतर्गत जे उद्योजक बनले आहेत त्यांना व्याज परतावा वेळेवर मिळत नाही. नवीन बनू पाहणार्या युवकांना सदरील पोर्टल बंद असल्याने नोंदणी करता येत नाही. सदरील योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँकाकडून टाळाटाळ केली जात असल्याच्या देखील तक्रारी आहेत. त्यामुळे महामंडळाकडून येत असलेल्या अडचणी दूर करून मराठा युवकांना न्याय मिळावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मराठा आरक्षण समिती उपााध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना देखील हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मराठा युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजीही केली.
या वेळी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके, जिल्हा सचिव जोतिराम काळे, अण्णासाहेव पाटील फाऊंडेशन अध्यक्ष खंडू राऊत, मराठा समन्व्यक अक्षय नाईकवाडी, शिवराज्यभिषेक सोहळा समितीचे दत्तात्रय साळुंके तसेच या महामंडळ अंतर्गत येणारे लाभार्थी, मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
