धाराशिव (प्रतिनिधी)-  बीड येथे झालेल्या जुडो स्पर्धेमध्ये व नळदुर्ग येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज नळदुर्गची पौर्णिमा खरमाटे हिला सुवर्णपदक मिळाले आहे. त्यामुळे तिची निवड ऑल इंडिया युनिव्हर्सिटी राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या स्पर्धा जुडो आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स बनसारोळा, बीड येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज नळदुर्गची पौर्णिमा खरमाटे 70 प्लस वजन गटांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर आर्ट्स अँड सायन्स कॉलेज नळदुर्ग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या विभागीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाला. त्या स्पर्धेमध्ये बहात्तर किलो वजनी गटात पैलवान पौर्णिमा खरमाटे प्रथम सुवर्णपदाची मानकरी ठरली. विशेष म्हणजे बीड येथे झालेल्या या जुडो आणि नळदुर्ग येथे झालेल्या कुस्ती दुहेरी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळाले. ऑल इंडिया युनिव्हर्सिटी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. या खेळाडूला जुडोसाठी कैलास लांडगे व प्रवीण गडदे व कुस्तीसाठी पैलवान संदीप वांजळे व कपिल सोनटक्के यांचे मार्गदर्शन लाभले. या दुहेरी यशामुळे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व प्राचार्य राठोड व सर्व प्राध्यापक व सर्व क्रीडा प्रेमींनी कौतुक करून ऑल इंडिया युनिव्हर्सिटी साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.


 
Top