वाशी (प्रतिनिधी)-जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा दिनांक 6ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधी विद्यालय,चिखली येथे पार पडल्या.त्यामध्ये 19 वर्ष वयोगटा खालिल जिल्ह्यातील आठ संघानी सहभाग घेतला नोंदवला होता.त्यामध्ये कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी च्या मुलींनी तृतीय क्रमांक पटकावला.
मुलींनी महाविद्यालयाची छाप कायम ठेवली.संघाची कर्णधार सुप्रिया भरत रांजवन,रेणुका रवींद्र कोल्हे,आकांक्षा समाधान अनपट, साक्षी अनपट, राजनंदिनी उंदरे,अक्षरा टकले,सोनाली जाधव,वैष्णवी बनसोडे,धनश्री गायकवाड, अंजली शिंदे,श्रावणी हाके,वैष्णवी मेहेर या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली.क्रीडा शिक्षक प्रा.शशिकांत सरवदे,प्रा.डॉ.रविंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.या यशस्वी खेळाडूचे कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी चे प्राचार्य डॉ.अशोक कदम सर यांनी अभिनंदन केले.