परंडा (प्रतिनिधी)- हाजी सलीम डोंगरे यांची हज ऑल इंडिया वेल्फेअर सोसायटीच्या कार्यकारी समितीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हज क्षेत्रात काम करणाऱ्या ऑल इंडिया हज वेल्फेअर सोसायटीचे राष्ट्रीय सरचिटणीस सय्यद रियाझ यांनी सक्रिय हज कार्यकर्ते आणि अलिशा हज, उमराह टूर्स सर्व्हिसचे संस्थापक हाजी सलीम रज्जाक डोंगरे परंडा यांची महाराष्ट्र युनिटमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.त्यांची नियुक्ती सोसायटीच्या महाराष्ट्र युनिटचे राज्य सरचिटणीस ओवैस अहमद घोजारिया यांच्या संमतीने आणि नाशिक झोनचे उपाध्यक्ष झाकीर ए. सत्तार मणियार यांच्या शिफारशीवरून करण्यात आली आहे. त्यांना सोसायटी स्थापन करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत.

  नवनियुक्त जिल्हाध्यक्ष हाजी सलीम रज्जाक डोंगरे यांचे रिजवान अहमद घोजरिया, रेहान अब्दुल रहमान शेलिया, इम्तियाज अहमद कमरुद्दीन शेख, मोईन अयुब खान, नासिर साहेब खान, मोहम्मद शफीक रचभरे, खलील अहमद शेख, मोहम्मद फैसल खान लतीफ खान, मौलाना शोएब नदवी मौलाना अ. रहेमान खान, मौलाना बिलाल, हाफिज सकलेन सौदागर, हाफिजभाई करपुडे आदींसह अनेक सामाजिक व्यक्तींनी अभिनंदन केले आहे.

 
Top