परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील कारंजा केंद्र वडणेर येथे कार्यरत असलेले शिक्षक आबासाहेब कोळी यांची मुलगी मयूरी कोळी हिचा आयुर्वेदिक कॉलेज अकोला येथे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसीन ॲन्ड सर्जरी (बी.ए.एम.एस) या आयुर्वेदिक पदवीसाठी निवड झाली असून तिचा प्रवेश सुनिश्चित झाल्याने मयुरी हिचा सत्कार प्रहार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आबासाहेब कोळी व त्यांच्या पत्नी शिवकांता कोळी हे दोघेही शिक्षक असून आपले ज्ञानदानाचे पवित्र कार्य अगदी मनापासून विद्यार्थी केंद्रबिंदू मानून करत आहेत, सामाजिक शैक्षणिक कार्यात देखील ते अगदी अग्रेसर राहून प्रामाणिकपणे आपले कार्य करत आहेत याचीच पावती म्हणून त्यांची मुले देखील मेडीकल क्षेत्रात नाव कमावत नीट परिक्षेत यश संपादन करून मयुरीने बीएएमएस प्रवेश निश्चित केला आहे, ही अभिमानाची बाब आहे,तिचे ५वी ते ८ वी शिक्षण महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे तर ९ वी ते १०वी शिक्षण नवोदय विद्यालय तुळजापूर येथे झाले, सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे
प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने मयुरी कोळी आणि संपूर्ण कोळी परिवाराचा सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनोभावे शुभेच्छा दिल्या यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य सचिव वैजिनाथ सावंत, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, रामेश्वर रोकडे, शिवाजी सरपणे,शिवकांता कोळी मॅडम आदि पदाधिकारी उपस्थित होते.