परंडा (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) परंडा तालुका तालुक्यातील पुरगृस्त अतिवृष्टी मध्ये झालेल्या गावांमध्ये दिलीप वळसे पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाठवलेल्या किटचे वाटप तालुक्यातील शेळगाव, आनाळा, पिठापुरी, खासगाव ,जाकेपिपरी ढगपिपरी,बृम्हगाव ,जवळा (नि.)खासापुरी,आलेश्वरवाडी ,आवरपिंपरीसह अनेक गावांमध्ये किट वाटप करण्यात आले.
रिपाइं महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव संजय कुमार बनसोडे यांनी केलेल्या वंचीत कुंटूंबाना किट मिळत नसल्याने अंदोलन करण्यात आले होते. त्यांच्या आंदोलनाला यश आले असून बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष दादासाहेब सरवदे, आय टी शेल जिल्हाअध्यक्ष आकाश बनसोडे, माजी ता.अध्यक्ष फकिरा दादा, सुरवसे बाबा, गायकवाड जयराम,साळवे बापू हावळे उत्तम ओव्हाळ, संजिवन भोसले, दिपक ठोसर, भास्कर ओव्हाळ ,लालासाहेब भालेराव, रामा ओव्हाळ, धनाजी यसवद, लझ्मन सरवदे आदीसह मोठ्या प्रमाणात गरजूना किट वाटपात उपस्थित होते.