धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही पी शैक्षणिक संकुल छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथील आर.पी.औषधनिर्माण महाविद्यालयात  डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक औषध निर्माता दिन आणि शिक्षक दिन विविध उपक्रमांनी  उत्साहात साजरा करण्यात आला .

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना औषध निर्माण क्षेत्रातील भविष्यातील आव्हाने आणि या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टी आत्मसात करणे आवश्यक आहे. याविषयी सखोल व विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी  जागतिक औषध निर्माता दिनाच्या निमित्ताने कॅम्पसच्या प्रक्षेत्रावर विविध प्रकारच्या वनस्पतीच्या वृक्षाच्या रोपण करण्यात आले. पर्यावरण राक्षणाचा  संदेश देत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधत आपल्या शिक्षकां प्रति कृतज्ञता व्यक्त केली. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले होते ज्यामुळे कार्यक्रमात उत्साह संचारला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी कु. शिवानी येडे व कु. मधुलक्ष्मी थोरात यांनी केले, तर प्रा.विजय सुतार यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top