तुळजापूर (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनावर चार दरोडेखोरांनी चाकू आणि कट्ट्यासदृश वस्तूचा धाक दाखवून लूटमार केली. या घटनेत सोन्याचे दागिने, चांदीचे लिंग आणि रोख रक्कम मिळून तब्बल 2 लाख 20 हजार किमतीचा ऐवज लुटल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने भाविकांची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाविक, नागरिकांना सुरक्षा बाळगण्याचे आवाहन करायाचे माञ सुरक्षा यंञणा सक्षम ठेवायाची नाही या कारभारामुळे जनतेत नाराजी व्यक्त होत आहे. ही घटना शनिवार, दि. 25 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 3.15 वाजता सिंदफळ गावाजवळील घाटशिळ पायथ्याशी घडली.

या प्रकरणी  सतीश विरनाथ बिडवे (रा. निलंगा, जि. लातूर) हे कुटुंबासह इर्टिगा कार (क्र. एमएच-24/एडब्लु-8504) ने पंढरपूरकडे जात होते. प्रवासादरम्यान त्यांच्या पुतणीस उलटीचा त्रास झाल्याने त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. याचवेळी दोन मोटारसायकलवरून चार अनोळखी इसम आले व त्यांनी चाकू व कट्टा सदृश वस्तूचा धाक दाखवून कारमधील महिलांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी 57 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे लिंग व 7 हजार रूपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्याचवेळी जवळच उभ्या असलेल्या कोमल मंगल देवडे (रा. बरड, ता. फलटण, जि. सातारा) यांच्या कुटुंबालाही या टोळीने लक्ष्य केले. त्यांच्याकडूनही दागिने जबरीने काढून नेण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी सतीश बिडवे यांच्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

 
Top