कळंब(प्रतिनिधी)- कलोपासक मंडळाच्या वतीने दिं. 22 ऑक्टोबर रोजी विठ्ठल मंदिर कळंब येथे दीपावली पाडव्यानिमित्त प्रति वर्षा प्रमाणे स्वर्गीय कमलाकराव जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित  दीपोत्सव कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सौरभ नाईक, चेन्नई यांनी आपल्या गायन मैफिलीत रसिक श्रोत्यांची दाद मिळविली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन डॉ. शोभा पाटील, प्रा.आप्पासाहेब मिटकरी,रवी नरहिरे, प्राचार्य सुनील पवार,जीवन रत्नपारखी यांनी केले तर सरस्वती पुजा व स्वर्गीय कमलाकर जोशी यांच्या प्रतिमेस एस.आर. पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. यानंतर गायक सौरभ नाईक यांनी आपल्या गायनाची सुरुवात  केदार राग गायनाने  केली यामध्ये त्यांनी बडा ख्याल, छोटा तराना गायन केले ,नाट्य गीतामध्ये कट्यार काळजात घुसली नाटकातील ...... घेई छंद... मकरंद ....प्रिय हा ...मिलिंद मधु सेवनानंद ....स्वच्छानंद हे नाट्यगीत  तसेच मर्म बंधातील ठेव ही .....ठेवी जपून ....सुखाते...दुःख विना, तसेच भजन गायनामध्ये काया ही पंढरी.... आत्मा पांडुरंग .... नांदतो केवळ पांडुरंग ...भजन गायन केले तसेच त्यांनी गायन केलेल्या भजनात प्रसिद्ध भजन गायक पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या भजनांचा समावेश होता  भैरवी गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली,साथ संगत - तबला तेजस धुमाळ,संवादिनी  शशिकांत देशमुख ,पखवाज बंकट कुमार बैरागी यांनी केली,गायक , कलाकारांचे स्वागत श्रीकांत कळंबकर, ऍड ,मनोज चोंदे, यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार यशवंत दशरथ यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण्यासाठी  अनिल कुलकर्णी, डॉ. गिरीष कुलकर्णी, मच्छिंद्र साखरे, शंकर ताटे, निशा कळंबकर, आनिता कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

 
Top