वाशी (प्रतिनिधी)- बीड येथे अंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये कर्मवीर महाविद्यालय ,वाशी येथील विद्यार्थी समीर आनंद पानगावकर यांनी उज्वल यश संपादन केले आहे. विद्यापीठ संघामध्ये त्याची निवड झाली आहे.
त्या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये समीरच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम, वरिष्ठ विभागाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.रवि चव्हाण,समीरचे पालक आनंद पानगावकर, कार्यालयीन अधीक्षक मोहन डोलारे, ग्रंथपाल प्राध्यापक राहुल कुलकर्णी, मुख्यालिपीक शिवाजी साळुंखे,स्वप्निल शेळकांदे व दत्ता फुले उपस्थित होते.
सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम यांच्या शुभहस्ते समीरचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम म्हणाले की समीरच्या रूपाने महाविद्यालयाच्या शिरपेच्या मध्ये एक मानाचा तुरा रोवलेला आहे. समीरला मार्गदर्शन करणारे प्रा.कृष्णा थोरात व प्रा. डॉ.रवी चव्हाण यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. महाविद्यालयामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांचा अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास व्हावा अशी माझी नेहमीच भूमिका राहिलेली आहे त्या अनुषंगाने राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच क्रीडा विभागाच्या विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन यापुढेही महाविद्यालय देत राहील. समीरला माझ्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. सत्काराला उत्तर देताना समीर म्हणाला लहानपणापासूनच मला टेबल टेनिस या खेळाची आवड होती व इथे प्रवेश घेतल्यानंतर तसेच बार्शीला असताना प्रा. कृष्णा थोरात व प्रा.डॉ. रवी चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळे व महाविद्यालयाच्या सहकार्यामुळे मला हे यश मिळाले यापुढेही मी महाविद्यालयाचे नाव उंचावण्याचा माझ्या परीने प्रयत्न करीन. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रवी चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन प्रा. एम डी. उंदरे यांनी तर आभार ग्रंथपाल प्राध्यापक राहुल कुलकर्णी यांनी मानले.