धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, के. टी. पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, धाराशिव येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रपती व डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा “ वाचन प्रेरणा दिन ” उत्साहात साजरा करण्यात आला.

हा कार्यक्रम उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारे विचार मांडले. तसेच विविध प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करून त्यावर चर्चा केली. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचा प्रसार करणे व डॉ. कलाम यांच्या विचारांचे अनुकरण करणे हे होते.  तर प्राचार्य  डॉ अजित मसलेकर यांनी मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  महाविद्यालयातील  प्रा.शुभम पाटील, प्रा.राघवेंद्र मुंढे डॉ. पटेल मॅडम , प्रा. भदे(पवार) मॅडम, प्रा. वराळे मॅडम,प्रा कापसे मॅडम व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे  सहकार्य लाभले. 

 
Top