भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील ईडा - अंतरगाव येथील आयान मल्टी ट्रेड संचलित बाणगंगा सहकारी साखर कारखाना येथे शेतकरी दापत्य, संचालक मंडळ, बानगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन सोहळा पार पडला.

यावेळी मधुकर मोटे, आर. डी. सुळ, तात्यासाहेब गोरे ,हनुमंत पाटोळे, विजय बोराडे, ॲड. रामराजे साळुंखे, आबा खैरे, धनंजय हांडे, भाऊसाहेब खरसडे, संदीप पाटील, अण्णा पाटील, श्रीराम खंडागळे, अशोक नलावडे उपस्थित होते. यावेळी बानगंगा कारखान्याचे चेअरमन माजी आमदार राहुल मोटे बोलताना म्हणाले की, दिवाळीला कारखाना चालू होणार आहे .परंडा मतदारसंघातील शेतकऱ्याची उसाची अडचण येऊ देणार नाही .परिसरामध्ये जे कारखाने आहेत त्यांच्यापेक्षा अधिकचा भाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी मोठे म्हणाले. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, सभासद संचालक, सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख ,कर्मचारी कामगार उपस्थित होते.

 
Top