तुळजापूर (प्रतिनिधी)- नगर परिषदांच्या निवडणुकांचा धुरळा अजून खाली बसायचा होता तोच आता तुळजापूर पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गासाठी सुटल्याने सोमवार दि. 13 ऑक्टोबर रोजी जिल्ह ापरिषद, पंचायत समिती सदस्य आरक्षण झाल्याने तालुक्याच्या राजकीय पटावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. 

धाराशिव येथे पार पडलेल्या सभापती पदांच्या आरक्षण सोडतीत या पदाची सुटका खुल्या प्रवर्गासाठी झाली असून, त्यामुळे “राजकीय समीकरणांची नवी मांडणी” सुरू झाली आहे.राजकीय वर्तुळात खळबळ  दिग्गज सज्ज!तुळजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी बसण्यासाठी आता सर्वच पक्षांतील प्रमुख नेते, माजी सभापती आणि नवोदित कार्यकर्त्यांची मंदियाळी लागली आहे.राजकीय पातळीवर हे पद प्रतिष्ठेचं मानलं जातं  कारण तुळजापूर पंचायत समितीने अनेक दिग्गज नेत्यांना उभारी दिली आहे.माजी मंत्री मधुकर चव्हाण, कै. नरेंद्र बोरगावकर यांच्यासारख्या नेतृत्वांनी याच पदावरून राजकारणात मोठी झेप घेतली होती. त्यामुळे या वेळीही अनेक इच्छुक आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 10, राष्ट्रवादीने 7 आणि भाजपने 1 सदस्य निवडून आणला होता. मात्र, सत्ता बदलानंतर भाजप नेते आमदार रणाजगजितसिंह पाटील यांनी राजकीय कौशल्य वापरत पंचायत समितीवरील सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. सन 2020 ते 2022 या काळात भाजपच्या सौ. रेणुका भिवा इंगोले या सभापतीपदी कार्यरत होत्या. समितीची मुदत संपल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून येथे प्रशासक राज सुरू आहे.  या वेळी सभापती पदासह अणदूर व चिवरी गण देखील सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले आहेत. त्यामुळे हा टर्निंग पॉईंट ठरण्याची चिन्हे आहेत. “नगरपरिषदेच्या रणधुमाळीनंतर आता पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी ‌‘खुल्या मैदानातील राजकीय शर्यत' पाहायला मिळणार आहे. कोण विजयी ठरेल हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.


जिल्हा परिषद व पंचायत समिती तुळजापूर आरक्षण 2025

सिंदफळ  जिल्हा परिषद गट- एस सी महिला, सिंदफळ पंचायत समिती गण- ओबीसी महिला, अपसीगा पंचायत समिती गण - एस सी महिला, काक्रंबा जिल्हा परिषद गट- एस सी पुरुष, काक्रंबा पंचायत समिती गण- एस सी पुरुष, सलगरा दि पंचायत समिती गण- ओबीसी पुरुष, मंगरुळ जिल्हा परिषद गट- जनरल महिला, मंगरूळ पंचायत समिती गण- जनरल महिला, आरळी बु. पंचायत समिती गण- ओबीसी पुरुष, काटी जिल्हा परिषद गट- ओबीसी महिला, काटी पंचायत समिती गण- जनरल पुरुष, सावरगाव पंचायत समिती गण- जनरल पुरुष, अणदूर जिल्हा परिषद गट- जनरल पुरुष, अणदूर पंचायत समिती गण-जनरल पुरुष, चिवरी पंचायत समिती गण-जनरल पुरुष, काटगाव जिल्हा परिषद गट- ओबीसी पुरुष, काटगाव पंचायत समिती गण- जनरल महिला, तामलवाडी पंचायत समिती गण- जनरल महिला, जळकोट जिल्हा परिषद गट- जनरल महिला, जळकोट पंचायत समिती गण- जनरल पुरुष, होर्टी पंचायत समिती गण- जनरल महिला, शहापूर जिल्हा परिषद गट- एस सी पुरुष, शहापूर पंचायत समिती गण- ओबीसी महिला, येवती पंचायत समिती गण- एससी महिला, नंदगाव जिल्हा परिषद गट- जनरल पुरुष, नंदगाव पंचायत समिती गण- जनरल महिला, खुदावाडी पंचायत समिती गण- जनरल पुरुष.

 
Top