धाराशिव (प्रतिनिधी)- सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडुन गेलेल्या जमीनी व फळबांगांना महसुल, कृषी विभागाने केलेल्या पंचनामा,नुकसान प्रकार आणि प्रमाण यानुसार वाढीवची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे आमदार कैलास पाटील यांनी केल्याची माहिती जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली आहे.
जिल्हयासह राज्यातील 31 जिल्हयामध्ये जुलै ते ऑगस्ट मध्ये मोठया प्रमाणात अतिवृष्टी आणि सततचा पावसाचे पाणी साठल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन, उडीद, मुग, मका, कापुस पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे होऊन महसुल, कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याच्या आधारे शासनास नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर शासनाकडुन मदत जाहीर करण्यात आली. मात्र त्यानंतर सप्टेंबर मध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली. ऑगस्टमध्ये फक्त पिकाचे नुकसान झाले होते. परंतु सप्टेंबर मध्ये त्याच पिकाखालची जमीन खरडुन गेली. त्यामुळे ऑगस्ट पेक्षा सप्टेंबर मध्ये शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
जुलै, ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत असताना कोरडवाहु जमीनीवरील पिकांचे पंचनामे झाले आहेत. परंतु सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फळबागांचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांचेही पंचनामे महसुल, कृषी विभागाने केलेले आहेत. त्या पंचनाम्यानुसार सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीने खरडुन गेलेल्या जमीनी व फळबांगानाही नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे जे नुकसान ऑगस्टच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे आमदार कैलास पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.