तुळजापुर (प्रतिनिधी)- ग्राम पंचायत वडगांव लाख आणि  तुळजापुर यांच्या संयुक्त वतीने आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायती राज अभियान व मानसिक आरोग्य व समुपदेशन कौशल्य विकास कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाल. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे ग्रामीण विकास तज्ञ श्री. गणेश चादरे होते. कार्यक्रमास सरपंच शाहूबाई चंदनशिवे, उपसरपंच राजेंद्र करंडे, ग्रामपंचायत सदस्य शिवराज मेटे, राम चंदनशिवे, कुसुम चंदनशिवे, मंगलबाई गायकवाड, नीता करंडे, टकुबाई गायकवाड, तंटामुक्त अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते दामोदर गाढवे, सतीश करंडे, देविदास सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक  व  चे सामाजिक कार्यकर्ते शंकर ठाकरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चादरे यांनी सांगितले की, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग हा पंचायती राज व गाव विकास यशस्वी करण्याचा सर्वात महत्वाचा घटक आहे. वडगांव लाख गावात  च्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या आदर्श पाणलोट क्षेत्र विकास उपक्रमांमुळे गाव आज जलसमृद्ध, हरित आणि सर्वांगीण विकसित झाले आहे. 

चादरे यांनी सांगितले की, लोकसहभागाशिवाय कोणतेही सरकारी किंवा विकासात्मक उपक्रम यशस्वी होऊ शकत नाहीत.  त्यामुळे मुख्यमंत्री समृध्द पंचायती राज अभियानाचे यश ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागावर आधारित आहे. त्यांनी सांगितले की, गावकऱ्यांनी जेव्हा योजना, उपक्रम आणि विकास कार्यांमध्ये थेट सहभाग घेतला, तेव्हा त्या कार्यांचा परिणाम अधिक टिकाऊ आणि प्रभावी होतो.  त्यांनी याप्रसंगी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायती राज अभियानाची अष्टसूत्री यावर प्रकाश टाकला.

सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत,  जलसमृद्ध, स्वच्छ व हरीत गाव, मनरेगा व इतर योजनांचे, अभिसरण, गाव पातळीवरील संस्था, सक्षमीकरण, उपजीविका विकास, गृहनिर्माण, व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदानाद्वारे लोकचळवळ निर्माण करणे, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे या विषयांवर सविस्तर असे मार्गदर्शन केले. त्यांनी मानसिक आरोग्य आणि समुपदेशन कौशल्य विकास या विषयाच्या अनुषंगाने मानसिक ताण-तणाव व्यवस्थापन, भावनिक समस्या ओळखणे आणि त्यावर उपाययोजना करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 

गणेश चादरे यांनी पाणलोट विकासात ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला आणि गावाला जलसमृद्ध केले. त्याचप्रमाणे सर्व सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मुख्यमंत्री समृध्द पंचायती राज अभियान यशस्वी करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राम विकास अधिकारी यांनी केले, त्यांनी ग्रामस्थांच्या सहभागाद्वारे मुख्यमंत्री समृद्ध पंचायती राज अभियान यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला.


 
Top