तेर (प्रतिनिधी) बायफ संस्था आणि UNGC यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव तालुक्यातील वाणेवाडी येथे पारंपारिक शेती, गावरान बियाणे संवर्धन आणि भविष्यातील शेतीची दिशा या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात मोठ्या संख्येने शेतकऱी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बायफ संस्थेबद्दल तसेच संस्थेचे ग्रामीण भागातील कार्य आणि धाराशिव जिल्ह्यातील मागील दहा वर्षांतील प्रगती याविषयी प्रोजेक्टरच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.यानंतर डॉ. संतोष एकशिंगे यांनी सुरु होणाऱ्या नवीन प्रकल्पाची माहिती दिली तसेच पारंपारिक पद्धतीने शेती करण्याचे महत्त्व, गावरान बियाण्यांचे संवर्धन आणि या पद्धतीचा मानवी आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान जुन्या वाणांचे बी संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची नोंद घेण्यात आली. यावेळी महेश जमाले यांच्या नैसर्गिक शेतीविषयक अनुभवांवर आधारित TISS (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस) च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला व्हिडिओ शेतकऱ्यांना दाखवण्यात आला.या चर्चासत्रात पारंपारिक शेतीतील अडचणी, गावरान बियाण्यांचे संवर्धन, उपाययोजना आणि टिकाऊ शेतीची दिशा या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.कार्यक्रमासाठी बायफ संस्थेचे अधिकारी डॉ. संतोष एकशिंगे, डॉ. आतूल मुळे, डॉ. किशोर कदम तसेच TISS चे विद्यार्थी उपस्थित होते