तुळजापूर (प्रतिनिधी) -पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गासाठी सुटल्याने तालुक्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या मंडळींनी निवडणूक लढविण्याचीतयारी सुरू केली आहे.
आगामी निवडणूक चुरशीची आणि रोमहर्षक ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मुंबई येथे काल राज्यातील नगराध्यक्ष पदांच्या आरक्षण सोडती नंतर गुरुवारी धाराशिव येथे सभापती पदाचे आरक्षण प्रक्रिया संपन्न झाली यात तुळजापूर पंचायतसमिती सभापती पद हे सर्वसाधारण गटासाठी खुले राहिले. यामुळे
तालुक्यातील अनेक दिग्गज पुन्हा एकदा राजकीय रंगमंचावर आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत.या तुळजापूर पंचायत समिती पुर्वी काँग्रेस ताब्यात होती राज्यात सत्तांतर होताच येथे सत्तांतर होवुन ही पंचायतसमिती भाजप आराणाजगजितसिंहपाटील यांच्या ताब्यात गेली आता पुन्हा ही पंचायत समिती कुणाचा ताब्यात जाणार हे मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे.सदरील पंचायत समिती सभापती पद खुल्या गटासाठी सुटल्याने या निवडणुकीकडे जिल्हयाचे लक्ष लागले आहे.