भूम (प्रतिनिधी)-  भूम नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी सुटल्याने माजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्यावतीने भूम शहरातील महिलांची संवाद बैठक साहिल मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहामध्ये पार पडली.

या बैठकीला शहरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या संवाद बैठकीमध्ये संयोगिता गाढवे बोलताना म्हणाल्या की मागील 23वर्षाच्या कार्यकाळामध्ये माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली भूम शहरांमध्ये विविध प्रकारचे विकास कामे करण्यात आली आहेत .तसेच महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी विविध कामे करण्यात आली आहेत .व पुढील काळात विविध योजना आणून महिलांना स्वावलंबी करण्याचे आमचे प्रयत्न राहणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी शहरातील आलेल्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना शहरात झालेल्या विविध विकास कामाविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी शहरातील प्रत्येक वार्डमधील महिला उपस्थित होत्या.

 
Top