भूम (प्रतिनिधी)- ज्योतिर्लिंग दूध संकलन व शेतकऱ्यांचे मार्फत दूध उत्पादकांना बोनस वाटप व साडी चोळी, दूध उत्पादक सभासदांच्या विमा पॉलिसीचे वितरण दीपावलीनिमित्त माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते तालुक्यातील पाटसांगवी येथे हनुमान मंदिर सभागृहात करण्यात आले.
यावेळी धाराशिव जिल्ह्याचे दुग्धविकास अधिकारी ए एफ बिराजदार, हभप धर्मराज दादा सामनगावकर, उद्योजक विनोद जोगदंड, प्रगतशील शेतकरी गजानन शेवाळे, सिद्धेश्वर गुळवे, रमेश काळे, विकास कांबळे, महारुद्र दुरुंदे, भास्कर सरकाळे, राजेंद्र तिकटे, भास्कर लावंड, भारत दळवे, सर्जेराव इंदलकर, केरबा दळवे, बंडू आबा बोराडे, दिलीप नाईक नवरे, महादेव गुळवे यांची उपस्थिती होती.
ज्योतिर्लिंग दूध संकलन केंद्रमार्फत पाटसांगवी, वालवड, वाल्हा, सामनगाव, आनाळा, कार्ला, मुगगाव, राळेसांगवी, हिवर्डा, मलकापूर, नागेवाडी, ईट, तुमची वाडी या भागातील दूध उत्पादकांना वीस वर्षापासून बोनसचे वाटप केले जाते. यावेळी श्रीराम मुळे, रोहन जाधव, जालिंदर मोहिते, आदम शेख, दादासाहेब दळवी यांच्यासह सर्व गावातील दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान इंदलकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सर्जेराव इंदलकर यांनी केले.
पर्यावरणाची मान्यता मी मिळवली- माजी आमदार सुजितसिंह ठाकूर
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना ठाकूर म्हणाले की, कृष्णा मराठवाडा सिंचन योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे पाठपुरावा करून मी चालू केली. त्यावेळेस केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन पंचवीस वर्षे रखडलेली पर्यावरणाची मान्यता एक महिन्यात मंजुरी मिळवली.